Pages

Saturday, June 30, 2012




।माझा विठु।

  एक होती हरि अन हर,
पंढरीत उजाडता पहिला प्रहर,
घडे विठू नामाचा गजर
ओथंबुनिया.....1
चंद्रभागा भरुनी वाहे,
मूढ देखी पाहत राहे,
सावळे रूप ते विटेवरी,
पांडुरंगाचे ....2
निर्व्याज प्रेम विठूवरी,
ठेवी भक्त अन वारकरी,
स्वार्था अर्था विसरोनी जाती
याचिया चरणासी येतां....3
पाहावा विठ्ठल,
वदवावा विठ्ठल,
समजावा विठ्ठल,
सकळ जनांसी...4
रखुमेसी रूसवून,
उभा तो युगांपासून,
न घेता कुठलेच आसन,
टेकण्यासी...5
असा माझा विठू,
वसतो हर एक ओठू,
असे तो आनंदाचा साठू,
सामान्यांसी...6
 
--आदित्य