Pages

Thursday, August 18, 2011

आजी

होती एक म्हातारी आजी,
साऱ्या जगाची असे तिला सतत कालजी,
तास लागे तिला बनवाया एक भाजी , 
श्रीयुत होते तिचे एक निवृत्त फ़ौजी
अशी होती एक महतारी आजी.!!१!!

आजीचे पाय होते संथ मात्र जीभ होती सुसाट,
 चुका करणारा भेटला की लावे त्याची वाट,
रम्य असे तिच्या घरची पहाट,
स्वता राहून दारिद्र्यात देवांचा करी थाट-माट,
हाच असे आपल्या आजीचा रोजचा दिन पाठ!!२!!

जाण्याचे वेध तर कधीच लागले होते तिला,
रूणी आहे मी सर्वांची रोज सांगे देवाला
धन्य झाले मी की मला मनू जन्म मिळाला,
नकलत्पने माझा अवघा जन्म सुखावला,
नात्वांची लग्न होऊ देत मग ने मला,
अशी होती आजी जगण्याची आस होती जीला!!३!!
-------------XXXXXXXX------------