Pages

Monday, May 28, 2012



                                 मी भारत बंद " करूनच दाखवणार" !!!

मी भारत बंद " करूनच दाखवणार"
 पेट्रोल,डीझेल चे भाव वाढले कि माझ्या डोक्यात ठिणगी पेटणार,

मी भारत बंद "करूनच दाखवणार"
एरवी मी महागड्या गाडीतून ac लाऊन फिरणार,
माझी गाडी superb असली तरी लिटर मागे ६-७ मैल पळणार
पण मी भारत बंद "करूनच दाखवणार"

जग  भले २८ रुपये मिळवून गरीब न ठरो
भले माझ्या संपतीचा show नक्की करणार
पण मी भारत बंद "करूनच दाखवणार"

सबसिडी काढून घेतल्यावर आमचा तिळपापड होणार
तिकीट नाही मिळाले तर आम्ही प्रसंगी विरोधक हि बनणार
"union leader " म्हणत कामावर दांड्याच मारणार
आणि जेव्हा खरच उठाव करण्याची वेळ,
तेव्हा मात्र मुग गिळून गप बसणार,
सत्ता राजकारणातून जेवढा मिळवता येईल ते मिळवणार
buttt मी भारत बंद "करूनच दाखवणार"
                                                       -आदित्य.   

0 comments:

Post a Comment